Header Ads

तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार



तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार असल्याचे माहित होत आहे.  या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला आहे. ता PDF मध्ये पूर्ण पदांचा तपशील आणि माहिती दिली आहे. पूर्ण माहितीसाठी दिलेला PDF शासन निर्णय पहावा. या नवीन माहिती पत्रकानुसार नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७४६ अशा एकूण ४१२२ पदांची महाभरती लवकरच सुरु होणार आहे. राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होतं. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तलाठी पदे रिक्त असून, अनेक गावांचा अतिरिक्त प्रभार असल्याने जनतेच्या कामांना अडचणी येतात. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपवविण्यात आली आहेत. रिक्त पदांसह नव्याने पुनर्रचित सजा वाढ झाल्याने राज्यात चार हजार १२२ पदांची भरती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

No comments

Powered by Blogger.